Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘Pathan’ चित्रपटावरील टिका विवेक अग्निहोत्रींच्या अंगलट

मुलीचेच भगव्या बिकीनीवरील फोटो व्हायरल

मुंबई : शाहरुख खानच्या आगमी पठाण या सिनेमातील दीपिका पदुकोनच्या ‘बेशरम रंग’ गाण्यामधील भगव्या रंगाच्या बिकीनीच्या वादावर दिग्दर्शक विवेक अग्नहोत्रीने एक व्हिडीओ शेअर केला होता. याच वादावरून आता निर्माता- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचेच भगव्या बिकीनीवरील फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे विवेक अग्निहोत्री ट्रोल होत आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये एक तरुणी बेशरम रंग गाणे एकत होती. यामध्ये वरती पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे सुरू होते आणि एक मुलगी बॉलिवूडच्या चित्रपटांमधील अश्लीलता यावर बोलत होती. यावेळी अग्निहोत्री यांनी या गाण्यामुळे अश्लिलता फैलावत असल्याचा आरोप केला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले होते. मात्र, आता अग्निहोत्री यांची मुलगी मल्लिका हिचे बिकीनी फोटे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी हे फोटो ट्विट केले आहेत.

एका युजर्सने विवेक अग्निहोत्री यांच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, दुसऱ्यांना ज्ञान देण्यापेक्षा स्वत: च्या कुटुंबाला देखील देत जा…विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचा भगव्या बिकिनीवरील फोटो सोशल मीडियावर आता तूफान व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button