Breaking-newsराष्ट्रिय

मल्ल्याळम सुपरस्टार ‘मोहनलाल’ आणि ‘नरेंद्र मोदींच्या’ भेटीने राजकीय चर्चेला उधाण

Share On

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत खासदारांची संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपाची नजर आता दक्षिण भारताकडे आहे. यासाठी भाजपा केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अशा लोकांच्या चेहऱ्यांच्या शोधात आहे, ज्यामुळे लोकसभा जागा वाढण्यास मदत होईल. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) सुध्दा मागील काही दिवसापासून दक्षिण भारतमध्ये काम करत आहे.

सोमवारी मल्याळम ‘सुपरस्टार’ मोहनलाल यांनी पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांची भेट घेतली. या भेटीबदल नरेंद्र मोदीं यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मोहनलाल हे भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View image on Twitter

Narendra Modi

@narendramodi

Yesterday, I had a wonderful meeting with @Mohanlal Ji. His humility is endearing. His wide range of social service initiatives are commendable and extremely inspiring.

मोहनलाल यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यास भाजप त्यांना काँग्रेस खासदार शशि थरूर यांच्याविरोधात तिरूवनंतपूरच्या लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊन निवडणूकीच्या मैदानात उतरवू शकते. मोहनलाल यांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे देखील समर्थन असल्याची माहिती समोर येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button