Breaking-newsपुणेमहाराष्ट्र

रेल्वे डब्यांवर आरक्षण तक्ता चिकटवणे बंद

  • पेपरलेस कामकाजाकडे प्रशासनाचे आणखी एक पाऊल

पुणे – प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वेच्या डब्यांवर चिकटवण्यात येणारा आरक्षण तक्ता आता बंद करण्यात आला आहे. मागील सहा महिन्यांपासून प्रायोगिक तत्वावर सर्व ए -1, ए, बी श्रेणी स्थानकांवर रेल्वेंच्या आरक्षित डब्यांवर आरक्षण तक्ता चिकटवणे रेल्वे मंत्रालयाने बंद केले होते. यानंतर क्षेत्रीय रेल्वेकडून प्राप्त झालेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर याची समीक्षा करण्यात आली. शनिवारपासून (दि.1) आरक्षण तक्ता चिकटवणे कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत.

कागद वाचवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रेल्वे फ्लॅटफॉर्मवरील फिजीकल किंवा डिजिटल तक्ते पूर्वीप्रमाणेच प्रदर्शित केले जातील. तिथे इलेक्‍ट्रिक चार्ट डिस्प्ले आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत, अशा ठिकाणी फ्लॅटफॉर्मवर फिजिकल आरक्षण तक्ता चिकटवणे बंद करण्यात येईल. ज्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे कागदविरहीत होणार असल्याचे सांगण्यात आले.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button