श्रीलंकेतील तामिळींना संघराज्यात मिळणार अधिक अधिकार

कोलंबो – श्रीलंकेतील अल्पसंख्य तामिळींना आगामी काळात प्रांतिय परिषदेमध्ये अधिक अधिकार मिळण्याची शक्यता आहे. संघराज्यात उत्तर आणि पूर्वभागात राजकीय स्वायत्तता मिळण्याची मागणी तामिळींकडून केली जात होती. मात्र त्याऐवजी आता प्रांतिय परिषदेतील वाढीव अधिकार त्यांना मिळणार आहेत, असे वरिष्ठ तामिळी खासदार एम.ए. सुमंथिरन यांनी सांगितले.
श्रीलंकेतील नवीन राज्यघटनेमध्ये तामिळींच्या राजकीय अपेक्षांची दखल घेण्यात आली आहे. या राज्यघटनेच्या मसुद्याशी सुमंथिरन हे संलग्न आहेत. शुक्रवारी दक्षिणेकडील सिंहली प्रभावी गॅले भागातल्या एका परिसंवादामध्ये सुमंथिरन यांनी ही माहिती दिली.
राज्यघटनेच्या संघराज्य रचनेमधील उपाय योजनांबाबत सिंहली समाजाच्या मनात संशय आहे. ही संघराज्यरचना सिंहलींना उत्तर आणि पूर्वभागांपासून तोडून टाकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.





