Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्तांचे नागरिकांना गाजर – शिवसेना गटनेते राहूल कलाटेंचा आरोप

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सत्ताधारी भाजपाने आत्तापर्यंत शहरातील नागरिकांना गाजर दाखविण्याचे काम केले आहे. आत्ता तेच काम महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर हे शहरातील नागरिकांना गाजर दाखवित आहेत. तसेच पिंपरी चिंचवड शहर 2030 मध्ये राहण्यायोग्य शहर होईल, तसे होईल अशी भविष्यवाणी करु लागले आहेत. सध्या वर्तमान काळात मात्र नियोजन शून्य कारभार सुरू आहे, असा आरोप शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी केला आहे. 

महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या नियोजन शून्य कारभारावर आज (शनिवारी) शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी टिका केली.  महापालिकेचे आयुक्त आजही भाजपचे प्रवक्ते, घरगडी, आणि सल्लागारांचे प्रवक्ते असल्याचा आरोप केला आहे.

कलाटे म्हणाले की, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा एकाकी आणि एककलमी कारभार करत आहेत. तीन दिवसांपासून सल्लागारांसोबत बैठका घेत आहेत. त्यांची उत्तरे आयुक्तांच देत आहेत. या बैठकामध्ये त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचनांचा सल्लागारांने अंतर्भाव करणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. तसेच  सल्लागारांनी उत्तरे देने अपेक्षित असताना भाजपचे प्रवक्ते असलेले आयुक्त हर्डीकरच उत्तरे देतात.  मी कसा सल्लागारांच्या बाजूने आहे असे ते दाखवत असून ते आयुक्त न राहता सल्लागारांचे प्रवक्ते झाले असल्याचा आरोप कलाटे यांनी केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button