TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

फ्रान्सच्या नौदलाने दिली मुंबईला भेट

मुंबई | गेल्या काही दशकांत भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सहकार्य वेगाने वाढले आहे. भारत आणि फ्रान्स या दोन देशांचे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी फ्रान्स नौदलाच्या एकोनिट जहाजाने मुंबईतील नौदल विभागाला पाच दिवसीय सदिच्छा भेट दिली.एकोनिट जहाजाचे कमांडर जीन-बर्ट्रांड गयॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या नौदलाने २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत नौदलाच्या मुंबईतील तळाला भेट दिली. फ्रान्सचे नौदल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी विविध व्यावसायिक आणि सामाजिक विषयांवर संवाद साधला. या भेटीचा समारोप भारतीय नौदलाच्या वेस्टर्न फ्लीटच्या युद्धनौकेसह समुद्रातील सरावाने झाला.

याप्रसंगी कमांडिंग ऑफिसर कमांडर गयॉन यांनी वेस्टर्न नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भेट घेतली.
एकोनिट जहाजाची मुंबई भेट ही बाब दोन्ही नौदलांमधील वाढत्या सहकार्याचे आणि त्यांच्यातील वाढीव आंतरकार्यक्षमतेचे द्योतक आहे. शांतता आणि स्थिरता हे समान हिताचे असल्याने दोन्ही देशांचे नौदल त्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास कटिबद्ध आहे, अशी माहिती भारतीय नौदल विभागाकडून देण्यात आली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button