Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

ठाकरे गटाला मशाल चिन्ह; उष:काळ होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली!

मुंबई: शिवसेनेला मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला आज (दि. १०) निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यानंतर ठाकरे गटांच्या नेत्यांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी एक गीत देखील एका माध्यमाशी बोलत असताना म्हणाल्या. उष:काळ होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली हे गीत त्यांनी यावेळी माध्यमाशीशी बोलत असताना सादर केले.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, हा निर्णय आमच्यासाठी महत्वाचा होता. याला अनुसरून एक गाणे आहे की, उष:काळ होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली. पहिली लढाई आम्ही जिंकली आहे. प्रत्येक घराघरात मशाली पेटवू. पेटवा ही मशाल आणि दाखवा ही मशाल ठाकरेंची आहे. ‘शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे’ या नावाने आमच्या महत्त्वाच्या व्यक्तींचे ओळख मिलाली आहे.

आमचे पक्षप्रमुख हे जिंकले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पूर्ण नाव मिळाले आहेत.  शिवसेना, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ही तीनही नावे शिवसेनेकडे राहीली हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button