हिराबाई लांडगे यांच्या स्मरणार्थ खेळाडुंना पोशाख कीट वाटप
पिंपरी : हसुर दुमाला (जि. कोल्हापूर) या गावातील जय स्पोर्ट्स संघाच्या कबड्डीपट्टूना संदीप ठाणेकर यांच्या पुढाकाराने पोशाख किटचे वाटप करण्यात आले. याबद्दल गावातील खेळाडुंनी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ आमदार लांडगे यांचे जनसंपर्क अधिकारी संदीप ठाणेकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपल्या गावातील जय स्पोर्ट्स या संघातील खेळाडुंना पोशाख वाटप केले.
कोल्हापूर जिल्ह्याशी लांडगे कुटुंबियांचे ऋणानुबंध आहेत. आमदार लांडगे यांनी कोल्हापूर येथील तालमीमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचे वडील वस्ताद किसनराव लांडगे यांचाही कुस्तीक्षेत्रात कोल्हापूर परिसरात मित्र परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूरसह सांगली-सातारा परिसरात महापूराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी लांडगे कुटुंबियांनी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबवला होता. त्यामुळे कोल्हापूर आणि लांडगे कुटुंबियांची नाळ जोडलेली आहे. आमदार लांडगे यांच्या मातोश्री यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ खेळाडुंना पोशाख किट देताना विशेष समाधान वाटते, असे मत जनसंपर्क अधिकारी संदीप ठाणेकर यांनी व्यक्त केले.