Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र
राज्यात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात, शक्तिपीठांच्या ठिकाणी उत्साहात तयारी
पुणे : शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून घटस्थापनेनं प्रारंभ, महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांच्या ठिकाणी नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. सकाळी साडे आठच्या सुमारास तोफेची सलामी देऊन नवरात्र उत्सवाची सुरूवात झाली. त्यानंतर घटस्थापनेच्या धार्मिक विधीला सुरुवात होऊन अभिषेक आणि अन्य विधी पार पडले. दरम्यान, दुपारी १ वाजल्यानंतर अंबाबाईची अलंकार पूजा बांधण्यात येणार आहे.





