TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपुणे

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी सात वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

Share On

पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी सात वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. या प्रकरणी संगणक अभियंता मोटारचालकास अटक करण्यात आली.रिया उमेश पवार (वय ७) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचेे नाव आहे. या प्रकरणी मोटारचालक अमितकुमार संजय प्रधान (वय ४१, रा. कुमार पेरिविकल सोसायटी, खराडी) यांना अटक करण्यात आली. रियाचे वडील उमेश बंडू पवार (वय ३९) यांनी या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमितकुमार मगरपट्टा सिटीतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहेत.

दुचाकीस्वार उमेश आणि त्यांची मुलगी रिया दुचाकीवरुन खराडी भागातून जात होते. त्या वेळी शितळादेवी मंदिर चौकात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली.अपघातात गंभीर जखमी झालेल्या रियाला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोटारचालक प्रधान यांना अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button