Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियातील 8 चित्त्यांना मध्य प्रदेशातील नॅशनल पार्कमध्ये सोडणार

श्योपूर । महान्यूज। वृत्तसंस्था ।

भारतात 70 वर्षांनंतर चित्ते दाखल झाले आहेत. नामिबियामधून 8 चित्ते भारतात दाखल झाले असून त्यांचे विशेष विमानाने भारतात आगमन झाले. हे आठ चित्ते मध्ये प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहेत. चित्ते नामिबियाहून 8 हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चित्त्यांना नॅशनल पार्कमध्ये सोडतील. पंत्यांना दोन नर आणि एक मादी चित्ता आहे.

नामिबियातून आठ चित्ते आज भारतात आणण्यात आले आहेत. यामध्ये पाच नर आणि तीन मादी आहेत. नामिबियातून विशेष बोईंग 747-400 विमानानं ग्वालेर, मध्य प्रदेश येथे चित्त्यांचे आगमन झाले. या चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

विशेष अधिवास –
कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे.

चित्ते 24 तास देखरेखीखाली –
24 तास चित्तांवर देखरेख ठेवली जाणार आहे. यावेळी पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतील. चित्ता सामान्य अन्न खात आहे की नाही. बीट गार्ड त्याच्या दिनचर्येवर लक्ष ठेवतील. शिकार करणाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी येथे 8-10 चौरस किलोमीटरवर गस्त छावणी आहे. ज्यामध्ये रक्षक आणि त्यांचे सहाय्यक राहतात. याशिवाय एक्स आर्मीचे जवानही घेण्यात आले आहेत, असे वनविभागाचे अधिकारी जे.एस.चौहान यांनी सांगीतले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button