कुदळवाडीतील महापालिका शाळेत ‘शिक्षक दिन’ साजरा, दिनेश यादव यांचा पुढाकार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कुदळवाडी येथील शाळेत ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांना या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
शिक्षक दिनानिमित्त कुदळवाडी महापालिका शाळा क्रमांक ८९ येथील शिक्षकांना सन्मानित करण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून उद्याचा समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना वंदन व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. ज्ञानातून माणसाची सर्वाधिक प्रगती होत असते. ज्याप्रमाणे एखाद्या मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवत असतो.
दिनेश यादव म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे, पण त्यांना समृद्ध करण्यात शिक्षकांचा वाटा अत्यंत मोलाचा ठरतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीने गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा असे म्हटले आहे. शिक्षकांप्रती आयुष्यभर कृतज्ञ राहिले पाहिजे, असे मला नेहमी वाटते. तसेच यावर्षी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे शिक्षक दिनाला एक वेगळा आनंद झाला आहे.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक श्री संपत पोटघन उपस्थित होते. मारूती खामकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी रामकृष्ण लांडगे, कुंडलीक मोरे, विजय तापकीर, शरद गोरे, प्रकाश चौधरी, यश जाधव, करण पाखरे, स्वराज पिंजण, स्वप्निल पोटघन हे उपस्थित होते.





