Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय
Breaking : शिव मंदिरात जलाभिषेकादरम्यान चेंगराचेंगरी, २ महिलांचा जागीच मृत्यू
बिहार, सिवान : बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इथे बाबा महेंद्रनाथ शिव मंदिरात जलाभिषेकादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर मंदिराचा बंदोबस्त सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. खरंतर, करोनाच्या काळात दोन वर्षे बंद राहिल्यानंतर पहिल्या सोमवारी मंदिरात जलाभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. यावेळी ही घटना घडली आहे.





