पिंपरी / चिंचवड

एटीएम सेंटरमध्ये एटीएम कार्ड बदलून फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड पडले. ते कार्ड अनोळखी व्यक्तीने बदली करून दिले. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने एटीएम कार्डद्वारे एक लाख 43 हजार 297 रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार 14 मार्च ते 15 मार्च या कालावधीत एसबीआय बँकेचे एटीएम गवळीमाथा भोसरी येथेघडला.

शिवाजी काशिनाथ संगमे (वय 44, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 30 मे रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगमे गवळीमाथा भोसरी येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांचे एटीएम कार्ड खाली पडले. ते कार्ड अनोळखी व्यक्तीने बदली करून संगमे यांना दिले. त्यांनतर अनोळखी व्यक्तीने संगमे यांच्या एटीएम कार्डद्वारे एक लाख 43 हजार 297 रुपये वेगवेगळ्या एटीएम वरून काढून घेत संगमे यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button