पिंपरी / चिंचवड

कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल चोरला

पिंपरी l प्रतिनिधी

मोबाईलवर क्रिकेट पाहत असलेल्या तरुणाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दारू कुठे मिळते असे विचारले. त्यांनतर कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 30) मध्यरात्री साडेबारा वाजता बो-हाडेवाडी मोशी येथे घडली.

चेतन पुरन साहू (वय 30, रा. बो-हाडेवाडी, मोशी. मूळ रा. छत्तीसगड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहू आणि त्यांचा मित्र मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने फिर्यादीजवळ जाऊन ‘इथे कुठे जवळ दारू भेटते का’ असे विचारले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीच्या हातातून 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला आणि दुचाकीवरून पळून गेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button