पिंपरी / चिंचवड

मैत्रिणीसोबत चॅटिंग केल्याने सुरक्षा रक्षक मित्राला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी l प्रतिनिधी

पूर्वी एकत्र काम करणा-या मित्राच्या मैत्रिणीसोबत एकाने चॅटींग केली. त्या कारणावरून दोघांनी तरुणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 24) दुपारी साडेपाच वाजता ग्लोबल एसईझेड या कंपनीत हिंजवडी येथे घडली.

धनंजय पंजाब नांगरे (वय 22, रा. हिंजवडी), गजानन सोनवणे (रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओम प्रमोद भगत (रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पूर्वी एकाच ठिकाणी काम करत होते. आता फिर्यादी हे हिंजवडी येथील ग्लोबल एसईझेड या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी आरोपी फिर्यादी हे ड्युटीवर असताना त्यांच्याकडे आले. ‘तू माझ्या मैत्रिणी सोबत फोनवर का चॅटींग करतो’ असे म्हणून फिर्यादी यांना बांबूने मारहाण करून शिवीगाळ केली. ‘जर तू माझ्या मैत्रिणीला संपर्क केला तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button