पिंपरी / चिंचवड
प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर केला बलात्कार
पिंपरी l प्रतिनिधी
लांबच्या नात्यातील तरुणाने प्रेमसंबंध निर्माण करून तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात सांगवी येथे घडला.
याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादी तरुणीच्या सख्ख्या मावस मामाचा मुलगा आहे. त्याने फिर्यादी सोबत प्रेमसंबंध केले. फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.