ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘अजित पवार आडवे आले तरी उचला’ कार्यकर्त्याच्या प्रश्नावर पवारांचा पोलिसांना सल्ला
बारामती |“एक राष्ट्रवादी साठी उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमात एका नागरिकाने जागेची मोजणी असलेल्या वादाची तक्रार मांडली. ‘दोन गटांत वाद असल्याने समोरची व्यक्ती ऐकत नाही, असे सांगितल्यावर अजित पवार संतापले. त्यांनी त्याच क्षणी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पोलिस उपअधीक्षकांना निर्देश देऊन ‘एकत्र बैठक घेऊन मेळ बसवा, नाही तर या प्रकरणात अजित पवार आडवे आले, तरी त्यांना उचला’ असे स्पष्ट केले. यामुळे तक्रारदाराचीच गाळण उडाली.