तरुणाला रस्त्याच्या बाजूला घेऊन जात मारहाण करून लुटले
पिंपरी l प्रतिनिधी
मित्राला सोडून घरी निघालेल्या तरुणाला जबरदस्तीने रस्त्याच्या बाजूला नेऊन मारहाण केली आणि त्याच्याकडील मोबाईल फोन दोन चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी तीन वाजता अंकुश चौक, निगडी येथे घडली.
शिवाजी बाबुराव वाघमारे (वय 20, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरेश उर्फ प्रांजल सुनील घनवट (रा. निगडी), त्याचा मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र सचिन देवकाते याला सोडविण्यासाठी ऑटो रिक्षाने अंकुश चौक येथे गेले होते. मित्राला सोडवून ते घरी जात असताना दोन चोरट्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून जबरदस्तीने रस्त्याच्या बाजूला नेले. तिथे मारहाण करून फिर्यादी यांच्या खिशातील 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेला.