पिंपरी / चिंचवड

मोशीत फिरस्ती व्यक्तीचा खून

पिंपरी l प्रतिनिधी

मोशी येथे एका फिरस्ती व्यक्तीचा खून झाला. ही घटना सोमवारी (दि. 2) दुपारी उघडकीस आली.

सुरेश प्रभाकर काळे (वय 60) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आशिष सुरेश काळे (वय 26, रा. चाकण. मूळ रा. बुलढाणा) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील मयत सुरेश काळे हे मोशी परिसरात फिरस्ती होते. त्यांचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून कोणत्यातरी कठीण वस्तूने व हत्यारांनी मारून खून केला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास मोशी टोलनाक्याजवळ घडली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button