पिंपरी / चिंचवड
कॉलेजमधील विद्यार्थिनीचा विनयभंग; शिपायाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी
निगडी परिसरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा शिपायाने विनयभंग केला. याप्रकरणी शिपायाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 23 एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता आकुर्डी येथे घडला.
विनोद बाबासाहेब चव्हाण (रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमध्ये आरोपी हा शिपाई म्हणून काम करतो. त्याने फिर्यादी यांना 23 एप्रिल रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास फोन केला. फिर्यादी यांना आरोपीला ‘काय पाहिजे’ असे विचारले. त्यावर आरोपीने ‘तू तू तू’ असे म्हणून फिर्यादी यांचा विनयभंग केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.





