पिंपरी / चिंचवड

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून दरोडा घातल्या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

दुचाकीवरून जाणा-या एका व्यक्तीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून कोयत्याचा धाक दाखवून त्या व्यक्तीवर दरोडा घालून लुटले. ही घटना 13 एप्रिल रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजता आकुर्डी येथे घडली.

सौरभ चंद्रकांत कुलकर्णी (वय 35, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी मध्यरात्री सव्वादोन वाजता फिर्यादी त्यांच्या मित्राला घरी सोडून दुचाकीवरून घरी जात होते. ते आकुर्डी येथील संजय काळे ब्रिजजवळ आले असता सहा जणांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ व धमकी देत फिर्यादिकडील 22 हजारांचा मोबाईल फोन, रोख रक्कम, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, पनकार्ड आणि इतर ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button