पुनावळे येथे पाच लाखांची घरफोडी
पिंपरी l प्रतिनिधी
पुनावळे येथे एका घरात तीन अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. घरातील सर्व सदस्य पिरंगुट येथे यात्रेसाठी गेल्यानंतर चोरट्यांनी हा प्रकार केला. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री पावणे दोन ते अडीच वाजताच्या कालावधीत घडली.
अनुप संजय तपकीर (वय 31, रा. पुनावळे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या घरातील सार्वजन रविवारी रात्री पिरंगुट येथे यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर कुलूप लाऊन बंद होते. तीन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गॉगल्स असा एकूण चार लाख 99 हजार 827 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.