पिंपरी / चिंचवड
जावायासोबत कार्यक्रमासाठी निघालेल्या सासूचे गंठन हिसकावले
पिंपरी l प्रतिनिधी
जावायासोबत दुचाकीवरून कार्यक्रमासाठी जात असलेल्या सासूच्या गळ्यातील मिनी गंठन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री पावणे दहा वाजता भोसरी येथे घडली.
वर्षा चिंतामण खेंगले (वय 40, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या जावई आणि मुलासोबत दुचाकीवरून मैत्रिणीच्या घरी देवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या. त्या भोसरी-आळंदी रोडने जात असताना एसपीजी शाळेसमोर आल्या असता एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 15 हजार रुपये किमतीचे मिनी गंठन जबरदस्तीने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.