पिंपरी / चिंचवड

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणा-यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धमकी : तिघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणा-यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सट्टा लावणा-यांनी ‘मला हात लावायचा नाही. माझी ओळख लांबपर्यंत आहे. माझ्यावर काही कारवाई केल्यास चांगले होणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच पोलिसांसोबत झटापट केली. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री साडेसात वाजता काळेवाडी येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

सनी उर्फ भूपेंद्र चरणजीतसिंग गिल (वय 38, रा. काळेवाडी), रिक्की राजेश खेमचंदानी (वय 36, रा. पिंपरी), सुभाष रामकिसन अगरवाल (वय 57, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सनी सुखेजा (रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुंडा विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हजरतअली म. इसाक पठाण यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील राजवाडेनगर येथे आरोपी सनी गिल याच्या घरी आरोपी गुजरात टायटन आणि दिली कॅपिटल या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी सनी गिल, रिक्की खेमचंदानी आणि सुभाष अगरवाल हे तिघेजण काही इसमांकडून जुगाराची कटिंग घेऊन टी कटिंग आरोपी सनी सुखेजा याला देत होते.

आरोपी क्रिकेट बेटिंग हा जुगार खेळत असताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून आठ मोबाईल फोन, जुगारासाठी लागणारे साहित्य असा एकूण 27 लाख 25 हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी सनी गिल याच्यावर कारवाई करत असताना त्याने ‘मला हात लावायचा नाही. माझी ओळख लांबपर्यंत आहे. माझ्यावर काही कारवाई केल्यास चांगले होणार नाही’ अशी पोलिसांना धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांसोबत आरोपीने झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group