पिंपरी-चिंचवड मधील जलतरण तलाव आजपासून पूर्ण क्षमतेने सुरु
पिंपरी-चिंचवड |
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाचे स्थापत्य विषयक काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज (बुधवार) पासून हा तलाव 100 टक्के क्षमतेने सुरु झाला आहे. याबाबतची माहिती क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. शॉपिंग मॉल, जिम, जलतरण तलाव, धार्मिक, पर्यटन स्थळे, उद्याने 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास मान्यता दिली आहे. महापालिकेच्या आकुर्डीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाचे स्थापत्य विषयक काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज (बुधवार) पासून हा तलाव 100 टक्के क्षमतेने सुरु झाला आहे.
शनिवार ते गुरुवार सकाळी सहा ते दहा आणि दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा या वेळेत सर्वांसाठी 100 टक्के क्षमतेने सुरु तलाव सुरु राहणार आहे. शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असणार आहे. नागरिकांनी जलतरण तलावाचा पोहोण्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.