देहुतील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे पंतप्रधान मोदींना आमंत्रण
![Invitation to Prime Minister Modi for the inauguration ceremony of Shila temple in Dehut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Dehu-News-देहुतील-शिळा-मंदिराच्या-लोकार्पण-सोहळ्याचे-पंतप्रधान-मोदींना.webp.webp)
पिंपरी : श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले. वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे मंगळवारी (दि.29) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या तसेच गाथा देऊन तसेच तुळशीहार घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले. यानिमित्त शिष्टमंडळाने त्यांचे आभार मानले.
या शिष्टमंडळात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल – रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.