पिंपरी / चिंचवड
भाजी खरेदीसाठी गेलेल्या महिलेचे 90 हजारांचे दागिने हिसकावले
पिंपरी l प्रतिनिधी
भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपयांचे दागिने दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहा वाजता कोयनानगर, चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी सायंकाळी भाजी खरेदी करण्यसाठी कृष्णानगर येथील भाजी मंडईमध्ये गेल्या होत्या. भाजी घेऊन घरी येत असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे मिनी गंठण असे एकूण 90 हजारांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.