मनसेचा गुढीपाडवा मेळावा दणक्यात साजरा होणार!
मुंबई | निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्या. तसेच मनसेचा गुढीपाडवा मेळावा दणक्यात साजरा केला जाईल, तुम्ही ट्रेलर पहिला आहे. गुढी पडावा मेळाव्याला तुम्ही पिक्चर दिसेल, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्याची एक महत्त्वाची बैठक आज एमआयजी क्लब येथे पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बाळा नांदगावकर म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून राज साहेबांचे दौरे सुरु होते. आजच्या बैठकीमध्ये शिवजयंती धुमधडाक्यात साजरी केली गेली पाहिजे, हे राज ठाकरेंनी सांगितलं आहे. कोरोनामुळे गुढीपाडवा मेळावा झाला नाही. मात्र, या वेळीचा मेळावा होणार याबाबतही चर्चा झाली. निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.
गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेच्या आजच्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. तसेच, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे, शिलिनी ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.