पिंपरी / चिंचवड
किरकोळ वादातून चौघांना बेदम मारहाण
पिंपरी l प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दहा जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) रात्री पावणे बारा वाजता बारणे कॉर्नर, थेरगाव येथे घडली.
रिहाण पठाण, युनूस पठाण, बबलू पठाण, सनी चव्हाण, आकाश मैद आणि इतर चार ते पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भवानी पप्पूराम बंजारा (वय 21, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंजारा हे थेरगाव येथील एका बॅटरीच्या दुकानात काम करतात. त्यांच्या दुकानाच्या शेजारी एसआयपी एग्स सप्लायर्स नावाचे दुकान आहे. त्या दुकानातील आरोपी रिहाण याच्यासोबत फिर्यादी यांचा किरकोळ वाद झाला. त्यावरून आरोपी रिहाण याने त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन फिर्यादी, त्यांचा भाऊ जितेंद्र बंजारा, महिपाल बंजारा, बनवारी बंजारा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप तपास करीत आहेत.