पिंपरी / चिंचवड
टोळक्याकडून तिघांना मारहाण
पिंपरी l प्रतिनिधी
सात जणांच्या टोळक्याने तिघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 27) सायंकाळी सहा वाजता श्वास हॉस्पिटल जवळ, मेदनकरवाडी येथे घडली.
गणेश कोंडीबा मुंगसे (वय 35, रा. राहते, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या पाच ते सहा साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश, त्यांचा मुलगा यश आणि पुतण्या मानव असे तिघेजण रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मेदनकरवाडी येथील श्वास हॉस्पिटल येथे गेले होते. त्यावेळी हॉस्पिटलजवळ आरोपींनी फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि पुतण्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून आरोपी भोसरी बाजूकडे पळून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.