breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोन; शस्त्रे, स्फोटके आणि रसायन टाकले
![Pakistani drones again in Kashmir; Threw weapons, explosives and chemicals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/drone.jpg)
श्रीनगर | टीम ऑनलाइन
जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याच्या हेतूने पाकिस्तानी ड्रोनने बुधवारी पुन्हा या भागात स्फोटके, हत्यारे आणि पहिल्यांदाच रसायने टाकली, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक दिलबाग सिंह यांनी दिली.
काही दिवसांपासून पाकिस्तानची ड्रोन भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहेत. बुधवारी अशाच पाकिस्तानी ड्रोनने जम्मू-काश्मीरमध्ये हातबॉम्ब, स्फोटके, पिस्तुलं, दारूगोळा आणि पहिल्यांदाच लिक्विड रसायने टाकली. शांतता भंग करण्याच्या हेतूने पाकिस्तानमार्फत अशा कुरापती सुरू आहेत. यापूर्वी ड्रोनने हत्यारे आणि अंमली पदार्थ जम्मू-काश्मीरमध्ये टाकली होती. अंमली पदार्थाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर अतिरेकी कारवायांसाठी करावा हा त्यामागचा हेतू आहे. त्यानंतर बुधवारी शस्त्रे आणि स्फोटकांबरोबरच रसायने टाकली.