पिंपरी / चिंचवड
चिखलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी l प्रतिनिधी
शरद नगर चिखली येथे एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 24) दुपारी दीड वाजता घडली.
जय सतीश साठे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीचा वाईट उद्देशाने हात धरला. ‘मला तू लय आवडते. मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यासोबत लग्न करतो’ असे आरोपीने पीडित मुलीला म्हटले. त्यानंतर ‘तू जर आली नाही तर तुला बघून घेतो’ अशी धमकी देखील त्याने दिली. पीडित मुलीच्या बहिणीला आरोपीने शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक तपास करीत आहेत.





