पिंपरी / चिंचवड

फसवणूक परकरणी बाप लेकावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीची बनावट सही आणि शिक्का वापरून व्यावसायिकाची आणि न्यायालयाची फसवणूक केली. याप्रकरणी बाप लेकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 डिसेंबर 2017 ते 28 मार्च 2019 या कालावधीत पिंपरी येथे घडला.

रोहित शंकर काळभोर (वय 35), शंकर नामदेव काळभोर (वय 58, दोघे रा. प्राधिकरण, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पवन मनोहरलाल लोढा (वय 34, रा. निगडी प्राधिकरण) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहिनुर ट्रेडहोम प्रा ली या कंपनीचे संचालक रोहित काळभोर आणि व्यवस्थापक शंकर काळभोर यांना फिर्यादी यांच्या एक्साया ऍलॉईज प्रा ली या कंपनीने विश्वासाने अनामतपोटी धनादेश दिला होता. त्या धनादेशाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी व फिर्यादी यांच्या कंपनीचे नुकसान व्हावे यासाठी बँकेत भरला. फिर्यादी यांच्या कंपनीचा खाते उतारा न्यायालयात दाखल केला. त्यावर फिर्यादी यांची बनावट सही करून एक्साया ऍलॉईज प्रा ली या कंपनीचा बनावट शिक्का तयार करून खोटा दस्त न्यायालयात सादर केला. त्यानंतर न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यातील खाते उतारा हस्ताक्षर पडताळणीसाठी पाठवला. त्यात फिर्यादी आणि दस्तावरील सहीमध्ये तफावत आढळून आली. आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीचा बनावट शिक्का आणि सही करून फिर्यादी व न्यायालयाची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पतंगे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group