पिंपरी / चिंचवड

तलवारीने वार करत खुनी हल्ला : एकास अटक

Share On

पिंपरी l प्रतिनिधी

रस्त्याच्या वादातून चुलत भावाने तलवारीने वार केले. यामध्ये तिघेजण जखमी झाले असून याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 11) रात्री नऊ वाजता सोमाटणे फाटा, मावळ येथे घडली.

अनिल सीताराम दाभाडे (वय 40, रा. सोमाटणे फाटा, मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश दाभाडे, जया दाभाडे, विराज गणेश दाभाडे (वय 22, रा. सोमाटणे फाटा, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी गणेश हे चुलत भाऊ आहेत. जमिनीच्या रोडच्या कारणावरून त्यांच्यात जुना वाद आहे. फिर्यादी त्या रस्त्यावरून गेल्याने गणेश याने तलवारीने फिर्यादीवर वार केला. फिर्यादी यांच्या आईने हात मध्ये घालून वार अडवला असता त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली. आरोपी जया हिने लाकडी काठीने फिर्यादी यांच्या पत्नीला मारहाण केली. आरोपी विराज याने फिर्यादी यांच्या मुलीच्या हातावर क्रिकेट स्टंपने मारले. आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी विराज याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश मतकर तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button