Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण
मुंबई | प्रतिनिधी
देशात दररोज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. आता तर देशात दिवसाला लाखांच्या संख्येत रुग्ण वाढ होत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड, नेते मंडळी, अनेक खेळाडू, क्रिकेटर्स देखील या विळख्यात सापडले आहेत. त्यात आता भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, भारताच्या या माजी फिरकीपटूने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले असल्याचे समजते. हरभजन सिंगने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करुन घेण्यास त्यांनी सुचविले आहे. भज्जीने शुक्रवारी सकाळी ट्विट करत, आपल्याला कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे म्ह्ट्ले आहे. त्यामुळे तो घरीच क्वारंटाईन होऊन आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचे म्हटले आहे.





