राज्यातील ‘या’ नेत्यांना कोरोनाची लागण
पुणे | राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून अधिवेशनाच्या पाच दिवसांच्या काळात 10 मंत्री आणि 20 पेक्षा अधिक आमदार कोरोना बाधित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 22 प्रमुख नेत्यांना कोरोना संसर्ग झाला आहे.या नेत्यांनी स्वतःच ट्वीट करून ही माहिती दिली आहे. या नेत्यांमध्ये भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींचा समावेश आहे.
पंकजा मुंडे
माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Corona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 1, 2022
सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. सुळे म्हणल्या, “”कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.”
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
राधाकृष्ण विखे पाटील
“आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.”, असे ट्विट करत विखे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.#CovidTesting— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) December 30, 2021
बाळासाहेब थोरात
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.”
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2021
यशोमती ठाकूर
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विटरवरून माहिती दिली कि, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.”
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 31, 2021
वर्षा गायकवाड
राज्याच्या] शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य लक्षण असून त्यांनी स्वतःला विलगीकरण करून घेतल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे.
I learned today that I tested positive for COVID-19 after first feeling symptoms yesterday evening. My symptoms are relatively mild. I'm fine and have isolated myself. Request those who met me the past few days to take precautions.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 28, 2021
प्राजक्त तनपुरे
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. “आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी.” असे ट्विट त्यांनी केले आहे.
आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत ही विनंती.
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) December 29, 2021