TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

10 मंत्री 20 आमदारांना कोरोना, गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील – अजित पवार

पिंपरी चिंचवड | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर कठोर निर्बंध लागू करावे लागतील असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

अजित पवार म्हणाले अधिवेशनाच्या पाच दिवसांच्या काळात 10 मंत्री आणि 20 पेक्षा अधिक आमदार कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे कोरोना झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार आहे. वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता अधिक कठोर निर्बंध लावण्यात येतील असंही अजित पवार यांनी.
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. या शहरात रुग्ण संख्या वाढली की त्याचा प्रसार इतरही शहरात होतो. त्यामुळे या शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहून कटू निर्णय घ्यावा लागू शकतो असे सांगत अजित पवार यांनी राज्यावर पुन्हा एकदा निर्बंध लागण्याचे संकेत दिले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button