पिंपरी / चिंचवडपुणे

चुलतीला शेतात मारुन टाकण्याची धमकी

पिंपरी l प्रतिनिधी

‘शेतात जर सोयाबीन पेरली तर तुला आणि तुझ्या नव-याला शेतातच मारून टाकीन’ अशी धमकी पुतण्याने त्याच्या चुलतीला दिली. तर दिराने शिवीगाळ केली. याबाबत महिलेने न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 13 जून 2021 रोजी दुपारी साडेचार वाजता सुदुंबरे येथे घडला आहे. याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने फिर्यादी दिली असून तिच्या दीर आणि पुतण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती शेतात काम करत असताना आरोपी दीर आणि त्यांची पत्नी या दोघांनी फिर्यादी यांचे पती चालवत असलेल्या ट्रॅक्टरसमोर थांबून त्यांना शिवीगाळ केली. दीर आणि जावेने महिलेला शेतात सोयाबीन पेरायला विरोध केला. पुतण्याने ‘जर तू शेतात सोयाबीन पेरली तर शेतात तुला व तुझ्या नव-याला मारून टाकीन, अशी धमकी दिली. दिराने फिर्यादी महिलेसमोर अश्लील कृत्य करून शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून दुचाकी अंगावर घालून फिर्यादी यांना फ्रॅक्चर केले.

या प्रकरणानंतर फिर्यादी यांनी थेट न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी (दि. 13 डिसेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button