TOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे

चोवीस तासांत 7,350 नवे कोरोना रुग्ण, 7,973 जणांना डिस्चार्ज

पुणे | गेल्या 24 तासांत देशभरात 7 हजार 350 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर, 7 हजार 973 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 91 हजार 456 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 561 दिवसांतील हा नीचांक आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 46 लाख 97 हजार 860 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 41 लाख 30 हजार 768 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 98.37 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 202 रुग्ण दगावले असून, देशात आजवर 4 लाख 75 हजार 636 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.37 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 65.66 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच, कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 133.17 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button