धक्कादायक ! सात वर्षाच्या पुतणीवर काकाकडून लैंगिक अत्याचार
![धक्कादायक! भर दिवसा १२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/rape-miner.jpg)
पुणे | पुण्याच्या हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बावीस वर्षाच्या काकाने लाडीगोडी लावून सात वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केला. संबंधित आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यापासून आरोपी या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करत होता. जून ते सहा डिसेंबर 2021 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी एका 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या अल्लडपणा चा घर फायदा घेत आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध केले. तसेच याविषयी कोणाला सांगितले तर वडिलांना ठार मारेल अशी धमकीही दिली. दरम्यान काही दिवसांपूर्वी या चिमुरडीला त्रास होऊ लागल्यामुळे तिने आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.