Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
लोणावळ्यात २४ तासात १७२ मिमी पाऊस

लोणावळा – गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा व परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचे आगार असलेल्या घाटमाथ्यावरील लोणावळा शहरात मागील चोवीस तासात तब्बल १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा व परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सततधार कोसळणारा पाऊस व वारा यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून इंद्रायणी नदी व डोंगरभागातू वाहणारे नाले हे दुथडी भरुन वाहू लागले आहे. तर वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडल्याने विजेचा खोळंबा झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून जोराचा वारा व पाऊस परिसरात पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. पावसामुळे महामार्गांवरील वाहतुक देखील मंदावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे




