सीडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश
कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत देखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते असं वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. याबाबत लष्कराकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत आणि त्यांची पत्नीही होते. तसेच 3 जण गंभीर जखमी झाल्याचेही समजते. या सर्वांना वेलिंग्टन बेसमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर चौथ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
या हेलिकॉप्टरमधून एकूण 14 जण प्रवास करीत होते. यामध्ये बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या असं सांगितलं जात आहे. यामधील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.