धनकवडीत रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे | पुण्यातील धनकवडी परिसरात एका रिक्षाचालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तुषार कलशेट्टी (वय 31) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. रविवारी रात्री हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार कलशेट्टी हे पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात पत्नी आणि नऊ महिन्याचा मुलगा असे तिघे जण राहत होते. मागील दहा वर्षांपासून त्यांच्या चालवत होते. प्राथमिक माहितीनुसार मागील काही दिवसांपासून पती-पत्नीत वाद सुरू होते. याच वादातून त्यांनी गळफास घेतला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेच्या दिवशी तुषार घरी एकटेच होते. सोमवारी सकाळी स्वच्छता करणारे महिलेने घरात डोकावून पाहिले असता पुरुषाचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.