ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तीन वर्षाच्या मुलीने गिळले एक रूपयाचं नाणं, दोन तासानंतर काढले बाहेर

तळेगाव | तीन वर्षाच्या मुलीने गिळलेले एक रुपयाचे नाणं दोन तासानंतर बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. रविवारी (दि.19) देहूरोड परिसरात ही घटना घडली. किवळे येथील वरद रुग्णालयात मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.देहूरोड परिसरातील तीन वर्षाच्या मुलीने एक रुपयाचे नाणे गिळले, गिळल्याले नाणं मुलीच्या घशात अडकले. मुलीच्या पालकांनी तात्काळ दवाखान्यात धाव घेतली पण, घटना दुर्मिळ असल्याने उपचार उपलब्ध होत नव्हते. त्यानंतर मुलीला किवळे येथील वरद रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शस्त्रक्रिया लवकर करण्याचे डॉक्टरांसमोर आव्हान होते.

भूलतज्ज्ञ डॉ. दत्तेश गोरे यांनी व इंडोस्कोपी सर्जन डॉ. संदेश गावडे यांच्या प्रयत्नांनी दोन तासानंतर नाणं बाहेर काढण्यात यश आले. मुलीच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले. यासाठी डॉ. मंजिरी अहिरराव, डॉ. हितेंद्र अहिरराव, डॉ. दत्तेश गोरे, डॉ. संदेश गावडे, डॉ. सीमा यांनी सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button