दहशतवादी हल्ल्याची भीती, न्युझीलंड क्रिकेटसंघाने पाकचा दौरा केला रद्द
कराची – न्युझीलंड-पाकिस्तान यांच्यात आजपासून सुरू होणारा पहिला वनडे सामना सुरू होण्यापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव न्युझीलंड क्रिकेट संघाने आपला नियोजित पाकिस्तानचा दौरा रद्द केला. न्युझीलंड सरकारच्या गुप्तचर विभागाला संघावर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच न्युझीलंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे न्युझीलंडचे खेळाडू मैदानात आलेच नाहीत आणि हॉटेलमध्येच थांबले. लवकरच न्युझीलंड संघ आता मायादेशी रवाना होणार आहे.
यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्युझीलंड सरकारशी चर्चा केली. त्यांना सुरक्षतेची हमी देखील दिली. परंतु न्युझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंची सुरक्षा आम्हाला जास्त महत्त्वाची असल्यामुळे इम्रान खान यांची मागणी फेटाळली.तब्बल 18 वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर न्युझीलंड संघ पाकिस्तानमध्ये पुन्हा गेला होता. परंतु एकही सामना न खेळताच आता न्युझीलंड संघ मायदेशी रवाना होणार आहे. ह्या दौर्यात न्युझीलंड संघ 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार होता. त्यातला पहिला सामना 17 सप्टेंबररोजी होणार होता.