Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडीत स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे कार्ड वाटप…

  • परिसरातील २१० कुटुंबाना मिळाले आरोग्याचे सुरक्षाकवच..!

पिंपरी |

चिखली-कुदळवाडीत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत स्वी. नगरसदस्य दिनेशभाऊ यादव यांच्या हस्ते बुधवारी (दि. १५) रोजी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. या योजनेत नोंदणी केलेल्या जवळपास २१० नागरिक व त्यांच्या कुटुंबावर वैद्यकीय सहाय्यतेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत. या उपक्रमास स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांचे सहकार्य लाभले आहे. उपक्रमास रामकृष्ण लांडगे, रामभाऊ कोहिणकार,अँड नितीन मोरे,काका शेळके ,प्रकाश चौधरी, मोईद शेख उपस्थित होते.

‘आयुष्मान भारत योजना’ ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून, वंचित घटकांना आरोग्य संरक्षण व हेल्थकेअरच्या माध्यमातून उपचार मिळवून देणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी ५ लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजना मार्फत देण्यात येत असते, अशी माहिती दिनेश यादव यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button