Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या मदतकार्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे पथक रवाना – महापौर माई ढोरे

पिंपरी – पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळून झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरीवस्तीत व नगरांमध्ये पुराचे पाणी शिरुन जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पूरस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सद्यस्थितीत पुरस्थिती ओसरली असुन तेथील उपाययोजना व मदतकार्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व स्वंयसेवकांचे पथक आज दि.२७ जुलै रोजी सायंकाळी सांगलीकडे रवाना होणार असल्याची माहीती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर व जिल्ह्यास पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पाणी ओसरत जाईल त्याप्रमाणे महापालिकेमार्फत शहराची स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना करण्यास सुरवात झालेली आहे.

सदर परिस्थितीवर उपाययोजना व मदतकार्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध संयंत्रे व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या पथकामध्ये ०४ अधिकारी, ७० कर्मचारी तसेच अंदाजे ३० स्वयंसेवक यांचा समावेश असुन सदर पथक साहित्य व उपकरणासहित मदतकार्यासाठी आज दि.२७ रोजी संध्याकाळी सांगलीकडे रवाना होईल अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button