विश्वविक्रमी मनसेच्या दहीहंडीला प्रविण तरडे नाचायला जाणार
पुणे: देशभरात कोरोना गेल्या दीड वर्षापासून ठाण मांडून बसला असल्यामुळे सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा वाढत्या संक्रमणामुळे या दहीहंडीच्या उत्साहावर पाणी फेरलं होतं. फेसबुक पोस्ट करून मनसे नेते अभिजित पानसे यांनी हे जाहीर केलं आहे. त्यांनी ही पोस्ट बुधवारी दुपारी केली असून त्यामध्ये विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार, असे म्हटले आहे. अन् या सोहळ्यात येऊन मी नाचणार अशी घोषणा प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रविण तरडे याने केली आहे.
मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दहीहंडीबाबत ही मोठी घोषणा केली. “विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार”, असं म्हटलं आहे. यावर आता प्रविण तरडेने “100 टक्के नाचायला येणार” अशी कमेंट केली आहे. ही कमेंट पाहताच त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. प्रविण तरडेने मनसेच्या दहीहंडिला पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
कोरोना महामारीचा धोका अद्याप टळलेला नाही. प्रशासन करोनची तिसरी लाट रोकण्यासाटःई हलचाली करत आहे. प्रशासन वारंवार सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंधांचं पालन करण्यास सांगत आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडी कशी साजरी केली जाणार याबाबत सर्वांच्याच मनात शंका आहे. सरकारने याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.