ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

नारायण राणेंच्या भेटीसाठी किरीट सोमय्या दिल्लीत

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोकणातील मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट्स, बंगले बेकायदेशीर बांधकाम आणि त्यावर कारवाई संबंधी चर्चा केली. स्वत: सोमय्यांनी याबाबतचं ट्विट करुन ही माहिती दिली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, दिल्ली येथे मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली, मुरुड दापोलीच्या समुद्र किना-यावर रिसॉर्ट्स, बंगले बेकायदेशीर बांधकाम आणि त्यावर कारवाई संबंधी चर्चा केली. या भेटीता त्यांनी फोटो देखील शेअर केला आहे.

किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या बांधकामांबाबत प्रश्न उपस्थित करुन, कारवाईची मागणी केली आहे. असं असलं तरी एकेकाळी किरीट सोमय्यांनी खुद्द नारायण राणे यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2016 मध्ये केली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button